15/12/25
Breaking News

कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विज्ञान प्रदर्शनातून विकसित होतो – उदय जाधव

सेलू / प्रतिनिधी
विज्ञानाच्या रोमांचक आणि व्यावहारिक पैलूंचे प्रदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत,त्या विषयात रस निर्माण करण्यात विज्ञान प्रदर्शने सहाय्यभूत ठरतात.तसेच कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत करतात असे मत सेलू येथील गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी व्यक्त केले.पंचायत समिती व विवेकानंद विद्यालय सेलू आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या (ता.२८ नोव्हेंबर) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की ,भविष्यातील शास्त्रज्ञ आणि नवोन्मेषकांना विज्ञान प्रदर्शनातून प्रेरणा मिळते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी,गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, करुणा कुलकर्णी केंद्रप्रमुख एकनाथ जाधव,मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे यांची उपस्थिती होती.
शाश्वत शेती,कचरा व्यवस्थापन,प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा,उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग,आरोग्य व स्वच्छता, जलसंवर्धन व व्यवस्थापन आदी विषयावर प्रयोग सादर करण्यात आले. प्राथमिक गटात ५१ तर उच्च माध्यमिक गटात १९ तसेच शिक्षक सादरीकरण प्रयोग ७ सादर करण्यात आले. प्रयोगांचे परीक्षण मिलिंद झमकडे,विलास खरात,योगेश पंडित, राहुल जाधव,सतीश साबळे यांनी केले.तालुका विज्ञान समन्वयक सौ.पद्माकर मॅडम ,विवेकानंद विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौधरी ,प्रास्ताविक नामदेव एकशिंगे,विज्ञान प्रदर्शन रुपरेषा अमोल गायकवाड ,आभार अनिल कौसडीकर यांनी मानले.विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातील केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक ,मार्गदर्शक शिक्षक तसेच सहभागी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

– प्राथमिक गटात उत्कर्ष विद्यालय तर माध्यमिक गटात नूतन विद्यालय प्रथम
प्राथमिक गटात कु.श्रेया चव्हाण व अनुष्का गजमल (उत्कर्ष विद्यालय सेलू -प्रथम ) हर्षदीप चव्हाण (प्रिन्स इंग्लिश स्कुल सेलू -द्वितीय ) हर्षदा मोगल व सिद्धी आवटे (नूतन कन्या शाळा सेलू-तृतीय )
माध्यमिक गटात दुर्गा मगर (नूतन विद्यालय -प्रथम ) फैजल अन्सारी -शांताबाई नखाते विद्यालय वालुर – द्वितीय ) स्वरा देशपांडे (नूतन कन्या शाळा -तृतीय )तसेच शिक्षकांनी सादर केलेल्या प्रयोगाप्राथमिक गटात उमेश क्षीरसागर (नूतन विद्यालय -प्रथम ) तर माध्यमिक गटात नारायण चौरे (ज्ञानतीर्थ विद्यालय- प्रथम)

Check Also

घरकुलाच्या थकीत हप्ते प्रकरणी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील बऱ्याच घरकुल धारकांचे थकित हप्ते तात्काळ जमा करावे नसता ठिय्या …