04/02/26
Breaking News

वाचन संस्कार रुजवण्यासाठी पुढाकार घ्यावा-उदय जाधव

सेलू(प्रतिनिधी)
‘वाचन संस्कार रुजविण्यासाठी सामाजिक संस्था, राजकीय मंडळींनी सार्वजनिक वाचनालयात विविध उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच अर्थिक अडचणीचा अडसर दूर करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात यावेत, यासाठी पुढाकार घेण्यात यावा.’ असे प्रतिपादन गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी केले.

शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयास दि २६ डिसेंबर शुक्रवार रोनी उदय जाधव यांनी भेट दिली. यावेळी या ग्रंथालयातील धार्मिक ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांची पहाणी केली.
स्पर्धात्मक युगात ग्रंथालयाचे कामगाज, याठिकाणी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक जाधव यांनी केले.
यावेळी ग्रंथालयाच्या वतीने अध्यक्ष महेश खारकर यांनी गटविकास अधिकारी उदय जाधव यांचा सत्कार केला. यावेळी सचिव चंद्रशेखर मुळावेकर, सहसचिव संजय विटेकर,गंगाधर गुंजकर, अशोक वाडकर, प्रा. के. डी. वाघमारे, ग्रंथपाल महादेव आगजाळ, पंडित जगाडे, अनिल टाके यांच्यासह वाचक उपस्थित होते.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …