16/10/26
Breaking News

गंगाखेड बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करा – पणन संचालकांचे जिल्हा उपनिबंधकांना आदेश

गंगाखेड (प्रतिनिधी) – गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत परवानाधारक आडत व्यापारी शेतमालाची बोली-लिलाव पद्धतीने खरेदी न करता थेट खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याच्या तक्रारीवरून पणन संचालक, पुणे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

याबाबत दि. १९ ऑगस्ट रोजी पणन संचालकांकडे तक्रार देण्यात आली होती. कारवाई न झाल्याने डोंगरी जनपरिषदेने दि. १२ ऑक्टोबरपासून पणन कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दि. २४ सप्टेंबर रोजी दिला होता.

या निवेदनाची दखल घेत पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधक, परभणी यांना गंगाखेड बाजार समितीच्या मनमानी गैरकारभाराची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.बाजार समितीत स्पर्धात्मक लिलाव पद्धत तात्काळ सुरू करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …