: इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे, तर इराण सतत प्रत्युत्तरादाखल हल्ले करत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने दावा केला आहे की, तेल अवीवमधील पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे कार्यालय आणि इस्रायली हवाई दलाच्या कमांडरच्या तळाला लक्ष्य करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर नेतन्याहू यांची प्रकृती खालावली असल्याचाही दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायली नेतृत्व हादरले आहे आणि आयआरजीसीचा दावा आहे की नेतन्याहू यांनीही या हल्ल्याचा धसका घेतला आहे. इस्रायली हवाई दलाच्या कमांडरच्या तळावर खैबर क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याचे वृत्त आहे.
अमेरिका-इस्रायली संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर वाढलेल्या इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. प्रत्युत्तरादाखल, तेहरान आणि त्याच्या सहयोगी मिलिशियांनी इस्रायली शहरांवर आणि आखाती प्रदेशातील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. तथापि, इस्रायलने पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा इराणचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. इस्रायलने असा कोणताही हल्ला झाला नसल्याचे म्हटले आहे.
Shabdraj www.shabdraj.com