04/02/26
Breaking News

सेलू नगर परिषदेच्या मतदारयाद्या मध्ये प्रचंड गोंधळ

मतदारांची पळापळ तर प्रशासनाची धावपळ
सेलू ( नारायण पाटील ) – नुकत्याच होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांच्या प्रभागनिहाय मतदार याद्या नगर परिषदेकडून प्रसिद्ध झाल्या असून त्यांची पाहणी केली असता यामध्ये प्रचंड घोळ असल्याचे दिसून येत आहे . सदरील याद्या दुरुस्त करण्यासाठी मतदारांकडून आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया चालू झाली आहे .यासाठी शेवटची तारीख १३ ऑक्टोबर होती .परंतु निवडणूक आयोगाकडून ही तारीख वाढवली असून आता १७ ऑक्टोबर पर्यंत मतदारांना आक्षेप नोंदवता येणार आहेत .

यामुळे आपली नांवे आपल्या प्रभागात आणण्यासाठी मतदारांची तसेच इच्छुक उमेदवारांची पळापळ सुरू असून निवडणूक आयोगाच्या निकषानुसार निर्धारित वेळेत प्रभागनिहाय सदोष मतदार याद्या करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम व उपमुख्याधिकारी बी एस चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली न प कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे .यासाठी न प च्या निवडणूक विभागात कर्मचार्याची टीम कामाला लागली आहे .परंतु यामधून मतदाराचे किती समाधान होते हे सांगणे सध्यातरी कठीणच दिसून येत आहे .

 

प्रभागनिहाय मतदार याद्या दुरुस्तीसाठी मतदारासोबतच त्या त्या प्रभागातील आपल्या मतदारांची नांवे आपल्या प्रभागात आणण्यासाठी इच्छुक उमेदवार देखील आक्षेप अर्जाचे गठ्ठे घेऊन नगर परिषदेत दिसून येत आहेत .
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदारद्यांचीच मतदारार याद्याची प्रभागनिहाय विभागणी करण्यात आली आहे .त्यामुळे बऱ्याच प्रभागातील मतदारांची नांवे इतर प्रभागात गेली आहेत .विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांची नांवे कोणत्याही प्रभागात असली तरी कांही फरक पडत नव्हता त्यामुळे त्यावेळी मतदार याद्यांच्या आक्षेप अर्जाची संख्या कमी होती .परंतु मगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभागातील नांवे त्याच प्रभागात असणे त्या त्या प्रभागातील इच्छुक उमेदवारासाठी गरजेचे असल्यामुळे ही पळापळ सुरू आहे .

 

शहरातील प्रभासगनिहाय विभागणी करतांना झालेल्या मतदार याद्यांच्या फोडाफोडीत कांही प्रभागातील मतदार याद्याची पानेच्या पानेच दुसऱ्या प्रभागात गेल्याचे देखील बोलले जात आहे .नगर परिषदेच्या निवडणुकीत एक एक मताचे मूल्य असलयामुळे आपली मते इतर प्रभागात न जाता आपल्याच प्रभागात राहावीत यासाठी प्रत्यक्ष मतदारापेक्षाही इच्छुक उमेदवारांची च पळापळ जास्त होत आहे .यामध्ये बऱ्याच मतदारांची नांवे दोन किँवा त्यापेक्षा जास्त प्रभागात आल्यामुळे देखील मतदारांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे .अर्थात यासाठी जबाबदार कोण आहे .हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे .आपली दोन पेक्षा जास्त प्रभागात आलेली नांवे मतदारांनी आपला राहता प्रभाग वगळून इतर प्रभागातून वगळून घ्यावीत असे आवाहन जरी प्रशासनाकडून करण्यात येत असले तरी याची कल्पनाच प्रत्यक्षात मतदारांनाच नसळतामुळे अडचणीचे ठरत आहे .

 

एकंदरीत निर्धारीत वेळेत सदोष मतदार याद्या तयार करणे हे काम अत्यंत जिकरीचे असून न प प्रशासनाकडून यासाठी कसोशीने प्रयत्न चालू आहेत .परंतु यामध्ये इच्छुक उमेदवारांना व मतदारांना किती समाधान मिळेल .हे सांगणे अवघड आहे .शहरातील प्रभागातील मतदारांच्या डबल आलेल्या नावामुळे शहरातील एकून मतदार संख्या व मतदार याद्यानुसार होत असलेली मतदार संख्या यामध्ये तफावतच होणार आहे

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …