09/05/26
Breaking News

वृत्तपत्राचे वाचन करून विवेकानंद विद्यालयात पत्रकार दिन साजरा

सेलू / प्रतिनिधी – आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाकडून ६ जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

 

स्वातंत्र्य चळवळीत तसेच सामाजिक बदलात वृत्तपत्राचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका पत्रकार बजावतात.या अनुषंगाने येथील विवेकानंद विद्यालयातील प्रसिद्धी विभागप्रमुख विजय चौधरी यांनी विद्यार्थ्यांना जगाचे ज्ञान व्हावे ,आजूबाजूला काय चालले आहे याची माहिती मिळावी या हेतूने इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांकडून विविध वृत्तपत्रांचे वाचन करून घेतले.जेणेकरून त्यांना रोज वृत्तपत्र वाचनाची सवय लागावी व त्यांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे.

Check Also

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा

​हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया …