04/02/26
Breaking News

गोल्डन ड्रिम्स इंग्लिश स्कूलमध्ये पत्रकार दिन सन्मानाने साजरा

गंगाखेड,दि 09 
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान राखत शहरातील गोल्डन ड्रिम्स इंग्लिश स्कूल येथे मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक ८ जानेवारी रोजी पत्रकारांचा गौरव सोहळा व क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर क्रीडा महोत्सवाची मशाल प्रज्वलित करून अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या संचालिका प्रा. डॉ. कविता सावंत (साळवे) व मुख्याध्यापक श्रवणकुमार देवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थित पत्रकार अन्वर शेख लिंबेकर, रामप्रसाद ओझा, शिवाजी कांबळे, सय्यद गौस, राहुल डोंगरे, भागवत जलाले, अंकुश कांबळे, गंगाधर कांबळे, अनिल साळवे, मकरंद चिनके, महेमूद शेख यांचा पुष्पगुच्छ व स्टील बॉटल देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना शाळेच्या संचालिका प्रा. डॉ. कविता सावंत (साळवे) म्हणाल्या,
“समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडत लोकशाही टिकविण्याचे कार्य पत्रकार करीत आहेत. चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांचे योगदान अतुलनीय आहे.”
पत्रकार रामप्रसाद ओझा व अन्वर शेख लिंबेकर यांनी पत्रकार दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत मनमोकळा संवाद साधला व क्रीडा सप्ताहासाठी शुभेच्छा दिल्या.
दि. ८ ते १२ जानेवारी दरम्यान क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, यात कबड्डी, खो-खो, धावणे, हर्डल रेस, सायकल रेस, क्रिकेट, लाँग जंप, गोळाफेक आदी विविध इनडोअर व आऊटडोअर खेळांचा समावेश असल्याची माहिती क्रीडा शिक्षक राहुल राठोड यांनी दिली.
कार्यक्रमास शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मूजमुले यांनी केले तर आभार प्रदर्शन अस्लम शेख यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …