सेलू / प्रतिनिधी – येथील पांडे गल्ली मधील अत्यंत पुरातन व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच संकटात सापडलेल्या भक्ताच्या हाकेला धावून येणाऱ्या विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नरसिंह मंदिर मध्ये प्रतिवर्षी प्रमाणेच आज कार्तिकी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ झाला आहे.
तीन दिवसीय या महोत्सवात आज दि ५ नोव्हेम्बर रोजी सकाळी श्री च्या मूर्तीस सतीशराव दिग्रसकर यांच्या वतीने कौस्तुभ दिग्रसकर यांच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक करण्यात आला.
या कार्यक्रमात दररोज रात्री ८ ते या वेळेत येथील गुरुवार पाठ मंडळाच्या वतीने गणपती अथर्वशीर्ष ,गीतेचे अध्याय ,रामरक्षा तसेच विष्णुसहस्रनाम पठन करण्यात येत आहे .तसेच दि ५ नोव्हेम्बर रोजी रात्री ९ वाजता मंदिर मध्ये पादुका प्रदक्षणा व भजन होणार आहे .
दि ६ नोव्हेम्बर रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत ” पिठलं भाकर व कण्या ” या प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
दि ७ नोव्हेम्बर रोजी प्रक्षाळ पूजेने उत्सवाची सांगता होणार असून रात्री ९ वाजता गुरुवार पाठ मंडळ यांचे विडा भजन होणार आहे .
तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा .असे आवाहन पुजारी अनंतराव पाटील ,देविदास पाटील ,केशव पाटील व नारायण पाटील यांनी केले आहे .
Shabdraj www.shabdraj.com