सेलू ( प्रतिनिधी )
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ,परभणी यांच्या निर्देशानुसार सेलू तालुका विधि सेवा समिती , वकील संघ सेलू न्यू हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने दि ९ जानेवारी रोजी अंमली पदार्थापासून युवकांची मुक्तता या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
शाळेच्या प्रांगणात आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी ऍड के ,बी ,शेरे हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून न्यू हायस्कुल चे मुख्याध्यापक धनंजय भागवत व मुख्य मार्गदर्शक म्हणून डी व्ही इंगळे यांची उपस्थिती होती .
यावेळी मार्गदर्शन करतांना ऍड शेरे यांनी युवकांना व्यसनमुक्ती विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले .तसेच
व्यसनाच्या आहारी जाऊ नये याबाबत विद्यार्थ्यांना शपथ दिली .
ऍड डी व्ही इंगळे व मुख्याध्यापक धनंजय भागवत यांनी यावेळी अंमली पदार्थाच्या सेवनाचे दुष्परिणाम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमांचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक करतांना ऍड जी व्ही बोकन यांनी कायदेविषयक मार्गदर्शनात कायद्याबाबत सविस्तरपणे माहिती दिली .
ऍड एस आर दिग्रसकर यांनी यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वकील संघ सेलू चे सर्व सन्माननीय सदस्य तसेच न्यू हायस्कुल शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .यावेळी विदयार्थी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
Shabdraj www.shabdraj.com