24/03/26
Breaking News

लक्की म्युझिकल ऑर्केस्ट्रा प्रस्तुत एक शाम मोहम्मद रफी के नाम

सेलू / प्रतिनिधी – भारत देशाचे महान गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त लककी म्युझिकल ऑर्केस्ट्रा प्रस्तुत एक शाम मोहंमद रफी के नाम या कार्यक्रमाचे आयोजन सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या सभागृहात 31 जुलै गुरूवार रोजी संध्याकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आले आहे.

 

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे नेते गोविंद भाऊ जोशी, नूतन विद्यालयचे मुख्याध्यापक किरण देशपांडे,नूतन विद्यालयचे क्रीडाशिक्षक गणेश माळवे सर, उपस्थित राहणार आहे सेलू शहरातील सर्व रसिक श्रोते यांनी देशाचे महान गायक मोहंमद रफी यांच्या सदाबहार गित गायन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार अबरार बेग, सय्यद,उस्मान भाई, सय्यद जाकेर लाला, डॉ जफर फारुखी, अझहर बेग उर्फ लक्की यांच्या वतीने कऱण्यात आले आहे

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …