17/10/26
Breaking News

टीईटी पेपर फुटी प्रकरणी मोठी कारवाई, आरोपीच्या बायकोलाही अटक

भिवंडी:  डी.एड. शिक्षकांच्या पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटी प्रकरणी चौथा आरोपी अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या पथकाला यश आलं आहे. मुख्य फरार आरोपी बिजेंदर गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी गुप्ता हिला पटना येथून ताब्यात घेतलं आहे. मुख्य आरोपीच्या पत्नीच्या खात्यावरही पैशांचा व्यवहार झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

टीईटी पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांकडून तपास अजूनही सुरू आहे. या प्रकरणी चौथ्या आरोपीला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी असलेल्या बिजेंदर गुप्ता याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. सुमन कुमारी हिला   मंगळवारी भिवंडी न्यायालयात न्यायाधीश एस एम सुतार यांच्या न्यायालयात हजर केलं. या पूर्वीच्या अटकेतील तिघा आरोपी एवढीचं सहा जुलैपर्यंत सुमनकुमारी गुप्ता हिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्य फरार आरोपी बिजेंदर गुप्ता हा या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार असून त्याचा यापूर्वी ओडिशा टी.ई.टी. पेपर फुटी प्रकरणात सहभाग होता. गुप्ता हा आपल्या पत्नीसोबत संपर्कात होता. त्यामुळे सुमनकुमारी हिला काही आर्थिक लाभ मिळाला आहे का? हे तपासण्यासाठी सरकारी अभिवक्ता अँड सुमित जाधव यांनी पोलीस कोठडीची मागणी केली.

तर आरोपीचे वकील अँड.शैलेश गायकवाड यांनी  मुख्य आरोपीची पत्नी असल्याने त्यांच्यात संपर्क होता. याचा अर्थ ती आरोपी होत नाही. असे असतं तर त्या आपल्या घरी राहिल्या नसत्या. त्यांनी पोलिसांना सहकार्य केल्याची बाजू मांडली आहे. यावर न्यायालयाने तपास कामी सुमनकुमारी गुप्ता हिला 6 जुलै पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

Check Also

CBSE च्या 2027 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहा, कधी असू शकते परीक्षा ?

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेच्या तारखा, …