04/02/26
Breaking News

स्पर्धा परिक्षांमधून करियर करावे-सपोनि कृष्णा घायवट

सेलू(प्रतिनिधी)जीवनामध्ये जर काही मिळवायचे असेल तर आताच अथक मेहनत करून अभ्यास करा आणि विद्यार्थिनी लहान वयात भुरळ पडणाऱ्या बाह्य अमिषाकडे दुर्लक्ष करून स्पर्धा परिक्षांमधून आपले करियर घडवा व आपल्या आई वडिलांचे तसेच शिक्षकांचे नाव उज्वल करावे असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा घायवट यांनी केले.
येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात सेलू पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थिनींना मार्गदर्शन व समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सपोनि कृष्णा घायवाट,सहायक पोलिस निरीक्षक वर्षाराणी पुंगळे, दामिनी पथकाच्या अस्मिता मोरे,जयश्री सोन्नेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना घायवट म्हणाले की,विद्यार्थिनींचे हे वय लहान आहे, यावयात वाईट प्रवृत्ती असलेली मुले मुलींना आकर्षित करतात.तसेच खोटी आश्वासने देऊन आपल्या जाळ्यात ओढतात आणि मुली सुद्धा कुठलाही विचार न करता त्या जाळ्यात अडकत जातात.जेव्हा धोका बसल्याचे लक्षात येते तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.यामुळे आत्ताच विद्यार्थिनी दक्ष राहायला हवे. तसेच सोशल मिडियाचा वापर अभ्यासासाठी करा.सोशल मीडिया वापरतांना काळजीपूर्वक वापरा कारण सोशल मिडियाद्वारे देखील त्रास दिले जात आहेत.यामुळे सोशल मीडिया वापरतांना अभ्यासाशी निगडित अप्लिकेशन वापरावेत.आणी जर कुणी विनाकारण त्रास देत असेल, काही दबाव दडपण टाकत असेल तर विद्यार्थिनींनी न घाबरता पोलिसांशी अथवा आपल्या शिक्षकांसोबत चर्चा करून माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थीनींसाठी सुरक्षित व विश्वासाचे वातावरण आणखी वाढवण्यासाठी सेलू पोलीस कार्य करत आहेत.पोलीस हे आपल्यासाठी आहेत ही भावना विद्यार्थिनींनी कायम लक्षात ठेवा.जर कुणाचा त्रास असेल तर लगेच पोलिसांना कळवा.तसेच गुड टच बॅड टच याबाबत विद्यार्थिनीनी दक्ष असावे.कुठल्याही प्रकारे आपल्या आईवडिलांना त्रास होईलनासे वागू नका असा सल्ला सपोनि वर्षाराणी पुंगळे यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक नरेश पाटील यांनी केले . यावेळी धनश्री शिंदे,रेणू कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …