मराठा आरक्षणाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत मोठ्या लाखोंच्या संख्येने जाणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जोरदार तयारी सुरू आहे. आंदोलनादरम्यान दंगल घडवण्याचा कट आखण्यात आला आहे. गोव्याला नुकताच झालेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट रचला गेला, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. यावर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी पलटवार केला आहे.
ते म्हणाले, त्यांचा जो आरोप आहे की मराठा आंदोलनात दंगल घडविण्याचा कट केला हा कट कोणत्या बंदखोलीत झाला हे त्यांनी सांगायला पाहिजे. कारण आमचे अधिवेशन हे बंद खोलीमध्ये नव्हते किंवा चर्चाही बंद खोलीत नाही. आमच्या अधिवेशनाला फक्त ओबीसी नेतेच नव्हते गोव्याचे मुख्यमंत्री देखील होते आणि ते मराठा समजाचे आहेत. जे काही घडलं ते लाईव्ह आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी जो आरोप लावला आहे. कदाचित ते नैराश्यातून बोलले असतील अशी टीका बबनराव नायकवाडे यांनी केली.
Shabdraj www.shabdraj.com