04/02/26
Breaking News

भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी -प्रा.डॉ.सचिन खडके

परभणी,दि 24 ः
भौतिकशास्त्र विषयाची व्याप्ती ब्रम्हांडापासून ते अतिसूक्ष्म अणु-रेणूपर्यंत आहे. अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवाच्या प्रत्येक क्षेत्रात शिरकाव केला आहे. मुळात हे क्षेत्र भौतिकशास्त्र आणि गणित विषयाशी निगडित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्रातल्या विविध संधी ओळखून या विषयात पारंगत होऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन शारदा महाविद्यालयाचे मराठीचे प्रा. डॉ. सचिन खडके यांनी केले.

येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन, बी.एससी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वागत समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी हे होते. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा.रविशंकर झिंगरे, डॉ.सुरेंद्र येणोरकर, डॉ. विजय कळमसे, प्रा.प्रतापसिंह कछवे तसेच प्रा. पवन काकडे उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.खडके पुढे म्हणाले,काळ झपाट्याने बदलत आहे. काळानुसार आपण आत्मविश्वासाने स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे. आज मूलभूत संशोधनात ही अनेक संधी उपलब्ध आहेत परंतु याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झालेला दिसतो आहे. आपल्या गुरुजनांचा मार्गदर्शनाखाली करिअरच्या संधी शोधाव्यात असेही ते म्हणाले. प्रा. रविशंकर झिंगरे यांनी केले भौतिकशास्त्र मंडळाचा इतिहास आणि मंडळ स्थापन करण्यासाठीचे उद्दिष्टे स्पष्ट सांगून महत्व विशद केले तर अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.श्रीनिवास केशट्टी यांनी भौतिकशास्त्र मंडळाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्या सर्व उपक्रमाच्या माध्यमातून एक उत्तम विद्यार्थी घडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नेहा सूर्यवंशी यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रविशंकर झिंगरे, कु. गायत्री आगलावे आणि आरती गिराम यांनी तर आभार नारायण आडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी द्वितीय, तृतीय वर्षातील विद्यार्थी तसेच संजय पूदरवाड, महेश बरोडा, नरेंद्र माडे, सुरेश पेदापल्ली, दत्ता वाघ यांनी पुढाकार घेतला

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …