04/02/26
Breaking News

पाथरीत नगर पालीका निवडणुक निमीत्ताने अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक

रमेश बिजुले
पाथरी,दि 11 ः
नगर परिषद पाथरी सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, यासाठी विविध कक्ष स्थापन करून त्यामध्ये नेमण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.

ही बैठक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री  युवराज पौळ व  कृष्णा देशमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या वेळी निवडणूक कामकाजा विषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री. पौळ यांनी सर्व पथकांना नेमून दिलेले काम चोख, नियोजनबद्ध आणि पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने आणि नियमांचे पालन करून काम करावे, असेही सांगितले.या बैठकीला सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …