गंगाखेड (प्रतिनिधी) : गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी गंगाखेड, पालम आणि पूर्णा या तिन्ही तालुक्यांतील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि प्रशासकीय अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रस्ते, पाणी, वीज, सिंचन, शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांना गती देण्याची मागणी आमदार गुट्टे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली.
शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासकामे वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Shabdraj www.shabdraj.com