सेलू,दि 25 ः
सेलू तालुक्यातील मोरेगावात गेल्या काही दिवसांपासून वानरांच्या टोळ्यांचा धुमाकूळ सुरू असून ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरातील धान्याची नासधूस, गोरगरिबांच्या घरावरील पत्र्यांचे नुकसान, घराच्या छतावरील सौर प्लेट फोडणे, विजेच्या तारा तोडणे, लहान लेकराच्या हातातील वस्तू हिसकावणे, घरात उतरून भाकरी पळवणे, त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येतात अनेकांची पत्रे पाडली आहेत.त्यामुळे घराच्या बाहेर निघताना भिती वाटत असून गावकरी घाबरून गेले आहेत.प्रत्यक्ष वानरामुळे दोन-तीन जण जखमी झाले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व वनविभागाकडे निवेदन सादर करून वानरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा,अशी मागणी केली आहे.अन्यथा ग्रामस्थ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.वानरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत कडून ठराव घेण्यात आला आहे.
या निवेदनावर दिनकर मगर,
जगदीश नाटकर,तुकाराम नाटकर, युवराज नाटकर,दिपक नाटकर,,यांच्या सह शेकडो ग्रामस्थाच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत
Shabdraj www.shabdraj.com