04/02/26
Breaking News

सेलूच्या श्रीमती सुरेखा आहेरकर-पाटवकर यांना कर्तृत्ववान माता सन्मान पुरस्कार जाहीर

सेलू ( प्रतिनिधी )
मानव सेवा विकास प्रतिष्ठान परभणीच्या वतीने “कर्तृत्ववान मातांचा सन्मान पुरस्कार” सेलू येथील श्रीमती सुरेखा आहेरकर-पाटवकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार सन्मान सोहळा प्रतिष्ठांणच्या वतीने परभणी येथे २१ जानेवारी ते २५जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणाऱ्या आई महोत्सवामध्ये प्रदान करण्यात येणार आहे.
सुरेखा आहेरकर या आहेर बोरगाव येथे नितीन माध्यमिक विद्यालयात सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे दहावी शिक्षण पूर्ण होताच आई-वडिलांनी लग्न केले. लग्नानंतर बारावी व डी.एड शिक्षण पूर्ण केले. दुर्दैवाने लहान मुले असतानाच पतीचे निधन झाले. दुःखाचा डोंगर कोसळला, त्यात त्यांनी स्वतःला सावरत मुक्त विद्यापीठातून बी.ए, एम.ए (मराठी), एम.ए (अर्थशास्त्र) आणि मुख्याध्यापक व्यवस्थापन कोर्स पूर्ण करून बी.एड ला प्रवेश मिळवला. दरम्यान मुलांचेही उच्च शिक्षण केले. मुलगा परेश हा बी.जे मेडिकल कॉलेज पुणे, येथे एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण करतोय, तर मुलगी प्रतीक्षा ने फॅशन डिझाईन मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ती नांदेड विद्यापीठाची गोल्ड मेडॅलिस्ट विद्यार्थिनी राहिली. तिने लातूर येथे मेकअप आर्टिस्ट व नाट्यकलावंत म्हणून लौकिक कमावला आहे.
सुरेखा आहेरकर यांनी सामाजिक जाणीव ठेवत शाळेव्यतिरिक्त सकाळी दोन तास जादा तासिका घेऊन नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळवून दिले. त्यांना प्राप्त झालेल्या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लहाने, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने तसेच रामराव बोबडे, रामराव गायकवाड, वसंतराव डासाळकर, डॉ.शरद ठाकर, प्रा.ज्ञानेश्वर सोळंके, अवचार गंगाधर यांनी अभिनंदन केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …