सुशीलकुमार दळवी
पुर्णा,दि 13ः
येथील नगरपरिषदेचे पहिले सर्वसाधारण सभा मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी नगराध्यक्षा सौ. विमलबाई कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्यक्षपदी यशवंत सेनेचे मुकुंद विठ्ठलराव भोळे यांची तर स्वीकृत सदस्यपदी उबाठाचे संतोष एकलारे व यशवंत सेनेच्या शेख नाहीद शेख अमजद यांची निवड करण्यात आली. पूर्णा नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सेनेच्या नगराध्यक्षा सौ. विमलबाई कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवार दि.१३ जानेवारी रोजी त्याच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा न.प.च्या सभागृहात संपन्न झाली. या सभेत उपनगराध्यक्ष सह दोन स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली.यात उपनगराध्यक्ष पदासाठी यशवंत सेनेचे मुकुंद भोळे यांनी तर सेक्युलर जनता दलाच्या रेखा खर्गखराटे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.या वेळी उपस्थित नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. त्यामध्ये मुकुंद भोळे यांना १३ पडली तर रेखा खर्गखराटे यांना केवळ १० मते मिळाली भोळे विजयी झाले.स्वीकुत सदस्यांसाठी जिल्हाधिकारी यांना गट नेत्यांनी लेखी स्वरूपात पत्र दिल्याने दोन सदस्यांच्या नावांची घोषणा पीठासन अधिकारी यांनी केली.या वेळी सभेला २३सदस्य उपस्थित होते.नवनियुक्त उपनगराध्यक्ष व स्विकुत सदस्य सभागृहाच्या बाहेर पडताच त्यांच्या समर्थकांनी फाटाक्याची आतिषबाजी करत आ.डाॕ.रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी सभेचे कामकाज मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी पाहिले तर त्याना निवडणूक विभाग प्रमुख शंकर काळे, अभियंताअब्दुल हकीम , राकेश जाधव आदींनी सहाय्य केले.
Shabdraj www.shabdraj.com