17/07/26
Breaking News

कमला एकादशीनिमित्त सेलूत “संगीत संध्या “

सेलू ( प्रतिनिधी )

जेष्ठ नागरिक सेवा संघ ,सेलू तसेच शांतीदूत परिवार पुणे शाखा सेलू तसेच शाम ए सरगम संगीत परिवार ,सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने कमला एकादशीचे निमित्त ” भजन संध्या ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
रायगड कॉर्नर येथील श्री स्वामी समर्थ उद्यान केंद्रात दि २७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक सेवा संघाचे कार्याध्यक्ष शामसुंदर आढे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले .
प्रदीप शिंदे यांच्या गणेश वंदनेने भजन संध्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .यावेळी जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष डी व्ही मुळे ,शामसुंदर आढे ,मोहनराव आनंदगावकर ,जेष्ठ पत्रकार नारायण पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती .

या नंतर शाम ए सरगम चे अध्यक्ष मोहनराव आनंदगावकर यांनी स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र तसेच काया ही पंढरी ,आत्मा हा विठ्ठल ” हे गीत सादर केले . दुर्गादास कुलकर्णी “कानडा राजा पंढरीचा” व “गेला हरी कुण्या गावा “हे भावगीत सादर केले .
“दुनियामे तेरा है बडा नाम ” व “हे कन्हैया किसको कहेगा तू मैय्या ” हे गीत शामसुंदर आढे यांनी सादर केले .
यानंतर अरविंद वाटुरे यांनी “विठू माऊली तू माऊली जगाची” हे गीत सादर केले .पंकज लांडगे यांनी ” साईनाथ तेरे हजारो हाथ “हे गीत सादर केले .
डॉ शैलेश मालानी यांनी “यशोमती मैय्यासे बोले नंदलाला” हे गीत सादर केले .
यानंतर विनोद मोगल यांनी “देहाची तिजोरी ,भक्तीचाच ठेवा ” हे गीत सादर केले .
निर्मिक कोचिंग क्लास चे संचालक शुकाचार्य शिंदे यांनी” जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ” हे गीत सादर केले .
सौ भरदम यांनी “येता जाता म्हणा रामकृष्ण हरी” हे गीत सादर केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ नागरिक सेवा संघाचे सचिव दुर्गादास कुलकर्णी यांनी केले .

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …