05/02/26
Breaking News

जिल्हाधिकारी  संजयसिंह चव्हाण यांनी सोडवला अखेर कलावंतांचा प्रश्न

परभणी,दि 18 ः
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना 2024-25 अंतर्गत जिल्हा परिषद परभणी मार्फत साहित्यिक व कलावंतांची निवड प्रक्रिया खूप दिवसापासून विविध कारणामुळे रखडली होती. यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत निवड समिती यांनी एकाच दिवसात सर्व कलावंतांच्या मुलाखती, सादरीकरण प्रक्रिया घेऊन त्याच दिवशी सायंकाळी कलावंतांच्या निवडीचा निकालही घोषित केला. एक प्रकारे जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व साहित्यिक व कलावंतांना दिवाळीची गिफ्ट देऊन संवेदनशीलता दाखवल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना” अंतर्गत सन 2024-25 साठी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये मा. जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकुश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी समाज कल्याण अधिकारी श्रीमती भोजने, महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती काळम,अशासकीय सदस्य म्हणून  काशिनाथ उबाळे,  शिवाजी सुक्ते, अनंत गोलाईत, संदीप राठोड हे सुद्धा मूल्यमापन समितीमध्ये होते.
दिवसभरात 81 कलावंताचे सादरीकरण पूर्णवेळ जिल्हाधिकारी महोदयांनी घेतले, आणि त्याच सायंकाळीच 35 विविध क्षेत्रातील कलावंतांची निवड करून यादी घोषित केली. सादरीकरणावेळी जिल्हाधिकारी महोदयांचे साहित्य व कला क्षेत्रातील प्रघाड ज्ञान पाहून अशासकीय सदस्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …