04/02/26
Breaking News

प्रदेश सहसचिव पदी निशिकांत नारायणराव पाटील यांची निवड

सेलू / प्रतिनिधी  – राज्यभरातील लाखो D.Ed. आणि B.Ed. धारकांच्या न्यायहक्कासाठी व त्यांच्या समस्या साठी सतत लढणाऱ्या “D.Ed.-B.Ed. Students Association” या संघटनेच्या प्रदेश सहसचिव पदी सेलू येथील के डी क्लासेस चे निशिकांत नारायणराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यगिरीचा सन्मान म्हणून ही निवड करण्यात आली आहे. निशिकांत पाटील यांनी राज्यातील विविध शिक्षक भरतीसंबंधी प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांचे राज्यभरातून सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …