04/02/26
Breaking News

सेलूत “नितीन चषक” क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

४ जानेवारी रोजी खेळपट्टीचे उदघाटन

सेलू / प्रतिनिधी – येथील नितीन कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त निमत्रितांच्या राज्यस्तरीय “नितीन लहाने स्मृती चषक ” क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून याबाबत नियोजनाबाबत बैठक आज माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

 

या स्पर्धा दि १८ ते २६ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय नूतन महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर होणार असून यासाठी नामवंत अशा १६ संघाना निमंत्रित केले जाणार आहे. या स्पर्धेतील विजयी संघाला प्रथम पारितोषिक २ लाख रुपये रोख व नितीन लहाने स्मृती चषक व ट्रॉफी (पाथरी मतदार संघांचे आमदार श्री राजेश दादा विटेकर यांच्या कडून) तर द्वितीय पारितोषिक १ लाख रुपये रोख नितीन लहाने स्मृती चषक व ट्रॉफी (ओम चैतन्य प.पू. श्री रामेश्वराय महाराज यांच्या कडून) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मालकावीर पुरस्कार रोख २५ हजार-रोख व चषक (अरिहंत गॅस एजेंसी श्री पारस काला यांचे कडून) सामन्यातील चषक व ट्रॉफी या सेलू बाजार समिती संचालक श्री नामदेव आप्पा डख यांच्या वतीने देण्यात येणार आहेत.

प्रत्येक सामनावीर पुरस्कार शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री बाबा काटकर यांच्या कडून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .व सामनावीर सन्मानचिन्ह (वरद एजेंसी श्री प्रशांत गोळेगावकर) यांच्या कडून वितरित केले जाणार आहे. कोल्डड्रिंग व्यवस्था अन्वरखान हे करणार आहेत .

प्रेक्षकां साठी प्रत्येक दिवशी एक लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्यांना देखील परितोषक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्याचे यूट्यूब लाइव्ह प्रक्षेपण देखील दाखवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. ४ जानेवारी रविवार रोजी या स्पर्धेच्या खेळपट्टीचे मान्यवरांच्या हस्ते उदघाट्न होणार आहे.

या स्पर्धेचे हे २६ वे वर्ष असून आतापर्यंत अनेक नामवंत खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे .ग्रामीण भागातील अंगात सुप्तगुण असलेल्या खेळाडूंसाठी या स्पर्धा वरदानच ठरत आहेत .तसेच शहरातील व परिसरातील क्रिकेट प्रेमी साठी देखील या स्पर्धा एक पर्वणीच ठरत असून सर्वजण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतात .हे विशेष .कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता खिलाडू वृत्तीने या स्पर्धा खेळल्या जात असल्यामुळे आपल्या संघाला सहभाग मिळावा यासाठी अनेक नामवंत संघ प्रत्यनशील असतात.

सर्व संघाची निवास व भोजन व्यवस्था आयोजकांच्या वतीने चोख करण्यात येते .ड्रेस कोड मध्येच या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेच्या नियोजनाबाबत नुकतीच एक बैठक घेण्यात आली .व त्यावेळी वरील महिती कळवण्यात आली आहे. यावेळी नितीन कला,क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाचे पदाधिकारी तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख,तालुका संघटक,उपतालुका प्रमुख,ओबीसी तालुका प्रमुख, दलित आघाडी तालुका प्रमुख, महिला तालुका प्रमुख,युवासेना तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, शहरसंघटक, दलित आघाडी शहर प्रमुख, शिवसेना नगरसेवक, व सर्व जेष्ठ शिवसैनिक.व पदाधिकारी तसेच क्रिकेट प्रेमींची उपस्थिती होती.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …