04/02/26
Breaking News

गंगाखेडात तिसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल नाही

 रामप्रसाद ओझा
गंगाखेड,दि 12 ः
गंगाखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊन तीन दिवस उलटले तरीही एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले इच्छुक सध्या तिकीट मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर काहींना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात अडचणी येत आहेत.

उमेदवारांकडून नोटरी शपथपत्र, विविध प्रमाणपत्रे आणि निवडणूक आयोगाच्या आवश्यक अटी पूर्ण करण्याचे काम सुरू असून, या प्रक्रियेतच बराच वेळ जात आहे. त्यातच पक्षांतर्गत तिकीट काटछाट आणि अंतिम यादीबाबतचा गोंधळ वाढल्याने उमेदवार सावध भूमिका घेत आहेत. अनेक प्रभागांमध्ये पक्षीय चर्चेला वेग आला असला तरी अधिकृत निर्णय न झाल्याने इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यास विलंब केला आहे.

दरम्यान, निवडणूक यंत्रणाही आवश्यक तयारी आणि तपासणी प्रक्रियेत व्यस्त असल्याने उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया काहीशी संथगतीने सुरू आहे. हौशी आणि नवोदित उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेचा पुरेसा अनुभव नसल्याने ते सावधपणे परिस्थितीचा अभ्यास करत आहेत.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …