09/05/26
Breaking News

बोरी येथे ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन विस्कळित; संसारोपयोगी साहित्याचे नुकसान

बोरी – जिंतूर तालुक्यातील बोरीसह परिसरात रविवारी सकाळी ६:३० वाजता ढगफुटी सदृश पाऊस झाला. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. बोरी येथील नामदेव नगरच्या बाजूला असलेला पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागला. त्यामुळे कालव्याच्या बाजूने सांडव्यातून पाणी वाहत होते. वाहताना लोकांच्या घरात पाणी शिरलेले घरातील संसार उपयोगी साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.

रविवारी सकाळी साडेसहा वाजता पाऊस सुरू झाला होता. सलग चार तास पावसाने नागरिकांचे बेहाल झाले आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू खाण्यापिण्याचे साहित्य रोज लागणारे वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. संगीता लखन तिवारी, अरुण बंडू गवारे, सुनीता सखाराम घाटुळ, कांताबाई रामभाऊ रणबावळे, सुमनबाई तुकाराम रणबावळे, नर्मदा बळीराम रणबावळे, कैलास वानखेडे, शंकरराव शिरजोशी, हरिभाऊ सातपुते, बापूराव राऊत, भगवान डोंबे, चंदू वाठुडे, विशाल ठोकळ यांच्यासह अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. तसेच गावातील गोंधळ गल्ली, केशव नगर, ऐंशी गल्ली सह गावात विविध ठिकाणी पाणी जमा झाले होते. शासनाच्या वतीने ग्राम विकास अधिकारी विनायक फुंड, मंडळ अधिकारी गंगाप्रसाद साखरे, तलाठी गंगाधर कोरडे, कोतवाल मयूर टाक हे पंचनाम्याला उपस्थित होते.

Check Also

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा

​हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया …