पाथरी प्रतिनिधी – ओबीसी आरक्षणात इतर समाजाचा समावेश करून होत असलेली घुसखोरी रोखावी, या मागणीसाठी पाथरी तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी आज तहसीलदारांना निवेदन दिले. या वेळी हजारोच्या संख्येने मान्यवर ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले. सरकारने मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश न करण्याची ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली. यापूर्वीच राज्य मागासवर्ग आयोग व सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचे स्पष्ट करून त्यांचे आरक्षण नाकारले आहे, हेही अधोरेखित करण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
१) शिंदे समिती बरखास्त करावी. २) समितीने गोळा केलेल्या माहितीचे पुनःसर्वेक्षण व्हावे. ३) गेल्या दोन वर्षांत वाटण्यात आलेली बोगस कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावीत. ४) संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन व फौजदारी कारवाई व्हावी. ५) ओबीसी आंदोलनकर्त्यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे.
विशेषतः प्रा. लक्ष्मणराव हाके, नवनाथ वाघमारे, अॅड. मंगेश ससाणे आदी ओबीसी आंदोलनकर्त्यांवर झालेले प्राणघातक हल्ले पाहता सरकारने त्यांना तातडीने सुरक्षा द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
निवेदनानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सकल ओबीसी समाज बांधव एकत्र जमले. या वेळी भरत रामभाऊ हारकाळ, प्रल्हाद चिंचाणे, विष्णु उगले, मंचकरात हरकळ, सुखदेव चिंचाणे, रंगनाथ विरकर, गोविंद हरकळ, गोविंद चिंचाणे, युसुफुद्दीन अंसारी, विश्वनाथ थोरे, अजय थोरे, सुखदेव काका चिंचाणे, विजय विरकर, तुकाराम राठोड, भरत हरकळ यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
या संपूर्ण घडामोडीचा निषेध म्हणून ४ सप्टेंबर रोजी सकल ओबीसी बांधवांच्या वतीने पाथरी येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
सकल ओबीसी समाजाने सरकारला इशारा दिला की, निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल सकल ओबीसी समाज हजारोच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते
तहसील कार्यालयासमोर ४ सप्टेंबर रोजी सकल ओबीसी बांधवांच्या वतीने 9 ते 5 या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त ओबीसी समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Shabdraj www.shabdraj.com