गंगाखेड (प्रतिनिधी):-
गंगाखेड शहरातील धैर्य मंगल कार्यालय येथे ‘देऊ बळ जगण्याचे’ या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यक्रमात गुरुवारी (दि.23) संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन व परभणी आयसीयु यांच्यावतीने पूरग्रस्त भागातील १०० महिला भगिनींना साडी चोळी व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी डाॅ.सुर्यकांतराव देशमुख हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डाॅ.रत्नाकर गुट्टे ,विशेष कार्य अधिकारी नानासाहेब कदम हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अच्युत महाराज दस्तापुरकर व सुभाष ढगे हे होते. पूरग्रस्त भागातील १०० महिला भगिनींना साडी चोळी व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. दीपावली भाऊबीज व डॉ.सूर्यकांत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशन व परभणी आय.सी.यु यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीशी नाते सांगून गेल्या दहा वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित केला जात असल्याबद्दल फाउंडेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर निरस यांचे आ.डॉ.गुट्टे यांनी कौतुक केले.
दरम्यान ‘सेवा हाच आपला सण’ या भावनेतून गेल्या दहा वर्षांपासून दीपावली आणि भाऊबीजच्या शुभप्रसंगी समाजातील वंचित, पूरग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात देत राहण्याची सातत्यपूर्ण परंपरा आयोजकांनी जपली आहे. त्यामुळे ‘देऊ जगण्याचे बळ’ हा उपक्रम फक्त सामाजिक जबाबदारी आणि माणुसकीचा सेतू ठरत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोतीराम चौरे प्रस्ताविक शामसुंदर निरस तर आभार गोकुळदास कलींदर यांनी केले.यावेळी स.पो.नि शिवाजी शिंगणवाड,उपसभापती संभाजी पोले,डाॅ.के.पी.गारोळे, माजी सभापती रामप्रभू निरस, मंजुषा दर्डा ,नारायणराव निरस,रोहिणी देशमुख,अन्वर शेख लिंबेकर,गोविंद यादव, संकल्प स्वराज्य फाउंडेशन व गुट्टे काका मित्र मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com