23/03/26
Breaking News

परभणी जिल्हास्तरीय डॉ.सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षा उत्साहात संपन्न

सेलू,,दि 02 ः
डॉ.सी. व्ही.रमण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित डॉक्टर सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षेची पहिली लेवल आज रविवारी (दि. १ मार्च) सेलू येथील बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल येथे यशस्वीरीत्या पार पडली.

परभणी जिल्हास्तरीय स्तरावर घेण्यात आलेल्या या परीक्षेत इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांतून घेण्यात आली. पहिल्या स्तरात १०० बहुपर्यायी (MCQ) प्रश्नांचा समावेश होता. पुढील स्तरांमध्ये प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट रिपोर्ट सादरीकरण व मुलाखत अशा चार टप्प्यांत परीक्षा घेतली जाते.

लहान वयात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी व भावी युवा वैज्ञानिक घडावेत, या उद्देशाने Kalyanam Education Society, परभणी यांच्या वतीने परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संस्थेच्या सचिव Priyanka Patil यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भविष्यात या परीक्षेचे स्वरूप राज्यस्तरीय करण्यात येणार असून ती इयत्ता सहावी व आठवीसाठी आयोजित केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. यामध्ये श्री. दिलीप चव्हाण सर, कालिदास जोशी , श्री. कालिदास राऊत सर, श्री. रंजीत गायके सर, श्री. संतोष बाबळे सर, श्री. डॉ. अमित कुलकर्णी सर, श्री. निशिकांत पाटील सर, श्री. सचिन कटारे सर, श्री. निपाणीकर सर, पल्लवी उपास्य मॅडम व निकिता नवघरे मॅडम आदींनी परीक्षेचे सुयोग्य नियोजन करून ती यशस्वीरित्या पार पाडली.

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि विज्ञानाविषयीची जिज्ञासा उल्लेखनीय ठरली. विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत असल्याची भावन पालक व शिक्षकांनी व्यक्त केली.

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …