14/02/26
Breaking News

परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

परभणी, दि. 22 ( : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे सहसचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 9 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक- 2025-26 करीता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना आज दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी परिशिष्ट 8 (अ) व 8(ब) मध्ये खालील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, परभणी कार्यालय, संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय, संबंधित तहसील कार्यालय आणि संबंधित पंचायत समितींच्या नोटीस बोर्डावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://parbhani.gov.in वर उपलब्ध असेल, सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी केले आहे.

Check Also

गाई व गोवंश चोरून नेणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलूची मागणी

सेलू / प्रतिनिधी – सेलू व परिसरामध्ये गाई चोरून नेणारी टोळी सक्रिय झाली आहे. सेलू शहरातून …