04/02/26
Breaking News

परभणीचा बालकलाकार विनायक कऱ्हाळे याचा चित्रपट २१ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

परभणी / प्रतिनिधी – अनेक राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये आपली छाप पाडल्यानंतर वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक दिग्दर्शित मराठी चित्रपट ऊत – भावनांचा उद्रेक हा येत्या २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात परभणीचा बाल कलाकार विनायक कऱ्हाळे हा नायकाच्या बालपणीच्या भूमिकेत अभिनय करताना दिसणार आहे.त्याने शरणम ही भूमिका साकारली आहे.

 

या चित्रपटात त्याची भूमिका ही विनोदी, मस्तीखोर, रोमँटिक आणि भावनिक अशी आहे. हा नायक कशा प्रकारे संघर्ष करून जिद्दीच्या जोरावर स्वतःचे आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करतो हे यामध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राम मलिक यांनी त्याला या चित्रपटात अभिनय करताना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. या चित्रपटात त्याने अभिनय करताना सगळ्या प्रकारचे सीन्स करताना त्याने खूप मेहनत घेतल्याचे दिग्दर्शक राम मलिक सर सांगतात. परभणी सारख्या शहरातून मुंबईत जाऊन त्याने आपली अभिनय आवड जोपसली आहे. त्याचा मे २०२५ मध्ये २६ नोव्हेंबर हा मराठी चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. लवकरच तो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सर्वाना पाहता येईल. तसेच तो सध्या एका मोठ्या हिंदी चित्रपटात देखील काम करत असून त्या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरु आहे. त्याने मालिका, नाटक आणि जाहिरात क्षेत्रात देखील काम केले आहे. सध्या तो दहावी वर्गात शिकत आहे. त्याचे मुळगाव परभणी जिल्ह्यातील ताडलिंबला आहे. संकर्षण कऱ्हाडे, अजिंक्य राऊत यासारख्या परभणीकर कलाकार यांच्यासोबत आता विनायक कऱ्हाळे या कलाकाराची देखील भर पडली असून परभणीकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्याच्या या चित्रपटाला सर्व परभणीकरानी भरभरून प्रेम, आशीर्वाद आणि प्रतिसाद देण्याचे आवाहन विनायक आणि परिवाराने यानिमित्ताने केले आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …