17/07/26
Breaking News

पतंजलीच्या मधाची  झाली साखर; ग्राहक पंचायतची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

नारायण पाटील
सेलू :- सेलू येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी पतंजली कंपनीच्या मधाबाबत गंभीर तक्रार दाखल केली आहे.
डॉ. मोरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी सेलू येथील पतंजली स्टोअरमधून एक किलो पॅकबंद मध खरेदी केला होता. त्यातील सुमारे अर्धा किलो मध वापरल्यानंतर उर्वरित अर्धा किलो मध पूर्णपणे गोठून साखरेसारखा झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अवघ्या १५ दिवसांत मध साखरेसारखा होणे म्हणजे तो शुद्ध नसून साखर मिश्रित असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
साखर झालेला मध संबंधित दुकानदार परमेश्वर गजमल यांना दाखवण्यात आला असता त्यांनी वरिष्ठ एजन्सीशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, “आमचा मध पूर्णपणे प्युअर आहे” असे सांगून ग्राहकांना साखर मिश्रित बोगस मध विकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्राहकांच्या विश्वासाला तडा गेला असून संबंधित उत्पादनामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
याप्रकरणी डॉ. विलास मोरे यांनी अन्न व औषध प्रशासन चे उपायुक्त श्री. चौधरी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …