सेलू ( प्रतिनिधी )
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस प्रशासन परभणी व स्वरयात्री म्युझिकल ग्रुप सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने सेलू शहरात देशभक्तीपर गीतांच्या भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता साई नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात स्वातंत्र्यसंग्राम, भारतीय संविधान, राष्ट्रप्रेम व बलिदान यांचे दर्शन घडविणारी देशभक्तीपर गीते सादर करण्यात येणार असून, नामवंत कलाकारांचा सहभाग राहणार आहे.
यामध्ये गंगाधर कान्हेकर, डॉ विलास मोरे, आत्माराम साळवे, सौ अनघा पांडे, सच्चिदानंद डाखोरे, दिपक देवा, डॉ आशिष मेहता, डॉ. राजेंद्र मुळावेकर, सौ पूजा तोडकर, संजय मंडलिक, सौ सायली दिग्रसकर, शिरीष संगई, सुरेंद्र दिशागत, सतीश ताठे हे कलावंत देशभक्तीपर गीते सादर करणार आहेत .
निवेदक म्हणून अतुल पाटील, अनंत विश्वंभर तर संयोजक रवी मुळावेकर, रवी कुलकर्णी असणार आहेत.
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला वेग आला असून ध्वनिव्यवस्था, प्रकाशयोजना व शिस्तबद्ध नियोजनावर भर दिला जात आहे.
शहरातील नागरिक, युवक, विद्यार्थी व देशप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रजासत्ताक दिनाचा उत्सव देशभक्तीच्या सुरांत साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दिपक बोरसे व स्वरयात्री म्युझिकल ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे
Shabdraj www.shabdraj.com