05/02/26
Breaking News

पेडगावकरांनी करुन दाखवलं..लोकसहभागातून केले पांदण रस्त्याचे काम

परभणी, (प्रतिनिधी): पेडगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या पांदण रस्त्याचे काम आज यशस्वीरित्या पूर्ण झाले. स.मि. पिंपळगाव रोड ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत असलेल्या या अडचणीच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आले होते. प्रारंभी 90% काम पूर्ण झाले होते, उर्वरित काम पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीने दिले होते. आज ते आश्वासन पूर्ण करत रस्ता वापरण्यासाठी खुला करण्यात आला आहे.
या कामाच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम देशमुख यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख, बाळासाहेब देशमुख, सरपंच आशिष हरकळ, उपसरपंच गोपाळ देशमुख, शेख सलमान, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हा रस्ता पूर्णत्वास आल्यामुळे नागरिकांना आरोग्य केंद्रात जाण्यास आता कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे गावात समाधान आणि समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे. रस्ता वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुला झाल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे.
गावाच्या प्रगतीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, एकात्मतेने केलेल्या कामाचे हे यश आहे, असे ग्रामस्थांनी नमूद केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …