व्यंकटेश्वर प्रतिष्ठानचा उपक्रम
सेलू / प्रतिनिधी – केंद्रात व राज्यात सर्वत्र गोवंश हत्या बंदी असतांना देखील सेलूत एका कत्तलखान्यात राजरोसपणे गोवंश हत्या चालू असल्याची खबर मिळताच सेलू पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक दीपक बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कत्तलखान्यावर धाड टाकून धडक कार्यवाही केली.
कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता त्यांनी कत्तलखान्यावर धाड टाकून तिन गोवंशाचे मांस व 13 गाईंची कत्तल होण्यापूर्वी सुटका केली. यावेळी त्यांनी घटनास्थळावरून गोवंशाचे मास ,कत्तलीचे सर्व साहित्य ,दोन आटो व आरोपीना अटक देखील केली.
याबद्दल श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलू व समस्त सेलूकरांच्या वतीने पोलिस निरीक्षक दीपक बोरसे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांचा आभार व्यक्त करून सत्कार केला. यावेळी जयसिंग शेळके, विनोद धापसे, गणेश शेवाळे, पवन धुमाळ, प्रद्युम्न आंधळे आदि उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com