सेलू (प्रतिनिधी):
येथील विवेकानंद प्राथमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
संस्थेच्या वतीने वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरवलेल्या आकर्षक चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या विविध चित्रांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष साइराज बोराडे हे होते. ,संस्थेचे कार्यवाह उपेंद्र बेलूरकर, भा. शि. प्र. संस्थेच्या सदस्या लीलाताई देशपांडे, गणेशकुमार कोठेकर,मु.अ. नामदेव एकशिंगे, स्नेहसंमेलन प्रमुख गजानन साळवे, सह-प्रमुख अश्विनी पावसे आणि विद्यार्थी संसदेचे प्रतिनिधी यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे यांनी केले तर सोनाली जोशी यांनी ‘चले निरंतर साधना’ हे प्रेरणादायी पद्य सादर केले .
शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मंडलिक यांनी केले . पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Shabdraj www.shabdraj.com