सोनपेठ,दि 06 ः
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत सन २०२५-२०२६ या खरीप खरीप हंगामाच्या संदभनि पिक विमा कंपनी, अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या वतीने पिक विमा सप्ताह साजरा करून प्रधानमंत्री फसल बीमा योजने संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
पीक विमा सप्ताहाच्या – अनुषंगाने तालुक्यात शिर्शी, सायखेडा , नरवाडी , लोहिग्राम, वडगाव उखळी भिसेगाव, खडका,गंगा पिंपरी, नयकोटा ,कानेगाव, करम, सोनपेठ या गावांमध्ये अॅग्रीकल्चर – इन्शुरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक बाबासाहेब इनकर, जिल्हा व्यवस्थापक श्री भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका व्यवस्थापक गंगाधर उराडे, अक्षय मोरे यांनी – तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना 31 जुलै 2025 पिक विमा भरण्याची अंतिम मुदत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी वेळेत विमान भरावा असे आवाहन केले. तसेच पीक विम्याचे महत्त्व विशद करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा विमा काढून पिके सुरक्षित करण्याचे सुचवण्यात आले.
Shabdraj www.shabdraj.com