आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष
परभणी प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक 15 मधून सर्वसाधारण पुरुष गटातून निवडून लढवलेले उमेदवार नंदकिशोर दरक हे अत्यल्प मताने पराभूत झाले. परंतु जनतेसाठी सतत सेवेस तत्पर असलेल्या नंदकिशोर दरक यांना परभणी महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य पदी घेण्यात यावे अशी मागणी प्रभागातील नागरिकांतून करण्यात येत आहे.

मागील निवडणुकीत नंदकिशोर दरक हे प्रभाग क्रमांक 15 मधून नगरसेवक पदी निवडून आले होते. तेव्हापासून त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला होता. प्रभागातील स्वच्छता असो ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असो किंवा पाण्याची समस्या असो तसेच तसेच महावितरण चा लाईन चा गोंधळ असो आधी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. तसेच कोरोना काळातील प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते सातत्याने झटत राहिले. प्रभागातील नागरिकांचा केव्हाही कधीही कोणाला नागरिकांनी कुठल्याही समस्या मांडल्या तर तात्काळ त्या सोडवण्यासाठी हजर होणारे एकमेव नगरसेवक म्हणून नंदकिशोर दरक हे प्रभागातील नागरिकांमध्ये परिचित व लोकप्रिय आहेत. परंतु नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत ते शिवसेना उभाटा गटाकडून निवडणुकीत उभे होते. त्यांचा अत्यल्प मतांनी पराभव झाला.
परंतु जनतेसाठी सातत्याने झटणारा अहोरात्र काम करणारा जनसेवक म्हणून ते प्रभागात परिचित आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य पदी घेण्यात यावे अशी मागणी केली आहे. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, तरुण व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांबरोबरच समाजातील व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांतूनही नंदकिशोर दरक यांना स्वीकृत सदस्य पदी घ्यावे यासाठी मागणी करण्यात येत आहे. तरी आता आमदार डॉक्टर राहुल पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Shabdraj www.shabdraj.com