परभणी / प्रतिनिधी
मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या वधु वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन नवामोंढा परभणी येथे पंढरीनाथ घुले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या हस्ते १९ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. यावेळी वधु वर परिचय मेळावा ही काळाची गरज असून सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे अहवाल उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सभापती यांनी केले
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठा प्रवाह विभागीय वधू-वर परिचय मेळावा दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी शुभमंगल मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन सभापती पंढरीनाथ घुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना वधु वर परिचय मेळावा ही काळाची गरज असून मराठा समाज बांधवांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे अहवाल याप्रसंगी केले तर आयोजन समितीचे अध्यक्ष धाराजी भुसारे यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम ७ वर्षापासून सातत्याने सुरू असून हे ८ वर्ष आहे हा होणारा कार्यक्रम विनामूल्य असून यात पुनर्विवाह वधू-वरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे तसेच या ठिकाणी पालक भेटीगाठी सोहळा होणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोपान लोंढे यांनी केले याप्रसंगी कृ.उ.बा.स.स संचालक अरविंद देशमुख आयोजन समितीचे मंचक शेळके, संचालक सोपान मोरे, प्रवीण जाधव, बाळासाहेब चोपडे, प्रसाद आरमळ, सचिन पुके, विश्वनाथ तरवटे, तूकाराम वाघ, विठ्ठल शिंदे,हरिहर शिंदे,भारत चापके,राम क्षीरसागर. व्यापारी बंधू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com