28/06/26
Breaking News

सेलूत आज पल्स पोलियो लसीकरण मोहीम; उपजिल्हा रुग्णालयात या मोहिमेचा शुभारंभ

सेलू / नारायण पाटील – राष्ट्रीय प्लस पोलियो लसीकरण दिनानिमित्त आज दि २८ जून रोजी सम्पूर्ण शहरात पल्स लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली .

या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी १० वाजता येथील उपजिल्हारुग्णालयात संपन्न झाला यावेळी सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत ,उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ संजय हरबडे , डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ ऋतुराज साडेगावकर यांच्यासह शहरातील डॉ विलास मोरे ,दिलीप डासाळकर,संजय मुंढे , रामकीशन कटारे ,अबरार बेग आदी पत्रकार बांधव तसेच उपजिल्हा रुग्णालतातील कर्मचारी उपस्थित होते .
शहरात एकूण २९ लसीकरण केंद्रावर तसेच २ फिरत्या पथकाद्वारे ही मोहीम राबवली जात आहे . यामध्ये 0 ते ५ वयोगटातील ७३२२ लाभार्थ्यांना या मोहिमेत पल्स पोलियोचे लसीकरण होणे अपेक्षित आहे .

यासाठी एकूण ५ पर्यवेक्षक ८२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून २ वाहने देखील फिरत्या पथकासाठी ठेवण्यात आली आहेत .
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या ० ते ५ वयोगटातील बालकांना ही लस पाजून घ्यावी .असे आवाहन डॉ संजय हरबडे यांनी केले आहे

Check Also

नूतन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू् येथील नूतन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त शुक्रवारी, …