04/02/26
Breaking News

सणासुदीच्या काळात धावणार पुणे-लातूर विशेष रेल्वे

परभणी –  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत पुणे ते लातूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, दिवाळीसारख्या गर्दीच्या काळात त्यांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

ही रेल्वे पुणे (हडपसर) आणि लातूर (Pune Latur Special Train) दरम्यान धावणार असून, 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीच्या प्रवासासाठी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

रेल्वे क्रमांक 01429 (लातूर ते हडपसर):
सुटण्याची वेळ: सकाळी 9 वाजून 30 मिनिटे
थांबे: हरंगुल, धर्मपुरी, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, जेऊर, दौंड
पोहोचण्याची वेळ: दुपारी तीन वाजून तीस मिनिटे
धावण्याचे दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार

रेल्वे क्रमांक 01430 (हडपसर ते लातूर):
सुटण्याची वेळ: दुपारी 4 वाजून 5 मिनिटे
थांबे: दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, उस्मानाबाद, धर्मपुरी, हरंगुल
पोहोचण्याची वेळ: रात्री 9 वाजून 20 मिनिटे
धावण्याचे दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …