सेलू / नारायण पाटील – शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरू तसेच सेलू शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान ,सेलू यांच्या वतीने पुण्यपावन श्रावनमासानिमित दि २५ जुलै ते २३ औगस्ट या कालावधीत केशवराज बाबासाहेब मंदिर मध्ये श्रीमद ज्ञानेश्वरी ग्रंथावर प्रवचन सेवा सुरू करण्यात आली असून यामध्ये पहिले पुष्प दि २५ रोजी ह भ प पुरुषोत्तम महाराज वालुरकर ( मालक )यांनी गुंफले. दररोज सायंकाळी ८ ते ९ यावेळेत ज्ञानेश्वरीचे अनेक गाढे अभ्यासक यामध्ये सेवा देणार आहेत .
दरम्यान दि १७ ते २३ औगस्ट या कालावधीत दररोज सकाळी ७ ते १० या वेळेत श्रीमद ज्ञानेश्वरी चे देखील सामूहिक पारायण होणार आहे .
या प्रवचन सेवेत दि २६ रोजी ह भ प भगवान महाराज गजमल ( डासाळा ),दि २७ रोजी ह भ प शिवाजी महाराज खवणे ,दि २८ रोजी ह भ प विष्णुदास नामदेव महाराज ढवळे( चारठाणा ) ,दि २९ रोजी ह भ प लक्ष्मीप्रसाद पटवारी( माजलगाव ) ,दि ३० रोजी ह भ प भगवान महाराज सेलूकर ,दि ३१ रोजी ह भ प शरदराव डोलारकर (परतूर ),दि १ औगस्ट रोजिभ भ प मोहन महाराज हातकडके(सेलू ) ,दि २ रोजी ह भ प तेजस कुलकर्णी( पुणे ) ,दि ३ रोजी ह भ प प्रजापीता ब्राम्हकुमारीज,दि ४ रोजी ह भ प अंबादासराव पावडे( हादगाव) ,दि ५ रोजी ह भ प अर्जुन महाराज होलिया(सेलू ) ,दि ६ रोजी ह भ प नामदेव महाराज इरळदकर ,दि ७ रोजी ह भ प अशोक महाराज आकात( सेलू ) ,दि ८ रोजी ह भ प चंद्रकांत महाराज सातोनकर ,दि ९ रोजी ह भ प प्रा श्रीहरी महाराज पितळे( मेहकर ) ,दि १० रोजी ह भ प रमेश महाराज गोरे (देवगाव फाटा ),दि ११ रोजी ह भ प अनंत महाराज पावडे( हादगाव) ,दि १२ रोजी ह भ प शंकर माधवराव आजेगावकर,दि १३ रोजी ह भ प प्रभाकरराव नित्रूडकर( परभणी) ,दि १४ रोजी ह भ प बालासाहेब महाराज आवटे( म्हाळसापूर ) ,दि १५ रोजी माऊलींचा जन्मोत्सव निमित्त भागवताचार्य ह भ प प्रा .संजय पिंपळगावकर ,दि १६ रोजी ह भ प प्रणव पटवारी( माजलगाव ) ,दि १७ रोजी भागवताचार्य ह भ प सुनील महाराज आष्टीकर ,दि १८ रोजी ह भ प जयंतराव धानोरकर ( छत्रपती संभाजीनगर ),दि १९ रोजी ह भ प श्री स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज ( यशवाडी ) दि २० रोजी ह भ प वैभव महाराज जगताप( पांडेपोखरी ) ,दि २१ रोजी अमोल महाराज बोधले ( डीकसळकर),दि २२ रोजी ह भ प विठ्ठल महाराज सायखेडकर व दि २३ रोजी ह भ प सौ .सुजाताताई भंडारे (परभणी ) हे प्रवचन सेवा देणार आहेत .तसेच शनिवार दि २३ औगस्ट रोजी सकाळी १० वाजता ह भ प शंतनू महाराज पाठक (वालुर ) यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
या प्रवचन सेवेचे हे २१ वे वर्ष असून सर्व जन कसल्याही प्रकारचे मानधन न घेता वेळेचे काटेकोर पणे पालन करून मोफत प्रवचन सेवा देतात .
सर्वांनाच या प्रवचन सेवेचा लाभ मिळावा यासाठी आयोजक युट्युब वर लिंक द्वारे प्रसारण करतात .अगदी कोरोना काळात देखील ही सेवा युट्युब द्वारे सर्वांना श्रवण करता आली हे विशेष .
आतपर्यंत अनेक ज्ञानेश्वरीच्या गाढया अभ्यासकांनी या प्रवचन सेवेत आपली सेवा दिली आहे .पुण्यपावन श्रावण मासात या कार्यक्रमाचे आयोजन करून आयोजकांनी श्रोत्यांना श्रवणाची एक प्रकारे पर्वणीच दिली आहे .त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी असणारे तसेच सेलूकर याची आतुरतेने वाट पहात असतात .
कार्यक्रमाचे सर्व आयोजक मंडळी देखील तन ,मन व धनाने अगदी आठ दिवस निःस्वार्थ पणे केवळ माऊलींची सेवा म्हणून कार्यक्रमाच्या नियोजनात तत्पर असतात .
गेल्या २० वर्षांपासून अगदी नियोजनात हा कार्यक्रम पडतो . भाविक भक्त व श्रोते देखील अगदी वेळेत उपस्थित राहून ज्ञानेश्वरी श्रवणाचा आनंद घेतात.
Shabdraj www.shabdraj.com