04/02/26
Breaking News

वाढदिवसानिमित्त सर्वद्वितीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके

सेलू ( प्रतिनिधी )
येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचालित नूतन विद्यालयाचे सहशिक्षक बाबासाहेब शंकरराव हेलसकर आणि सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक डी.डी.सोन्नेकर यांचे सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने अभीष्टचिंतन करण्यात आले. यावेळी, शिक्षक बाबासाहेब हेलसकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक स्तुत्य उपक्रम राबवला. त्यांच्या पत्नी स्वाती यांनी संस्थेच्या ‘गुणवत्ता सन्मान पारितोषिक’ योजनेसाठी चार पारितोषिकासाठी ४० हजार रुपयांची देणगी संस्थेकडे सुपूर्द केली. यातून इयत्ता दहावी, इयत्ता नववी, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालयातून सर्वद्वितीय क्रमांक मिळविणार्‍या विद्यार्थिनींना रोख पारितोषिक, तर इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलमध्ये सर्वद्वितीय क्रमांक मिळविणार्‍या विद्यार्थिनीला २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षापासून अनुक्रमे सौ.विजया दत्तात्रय गोरे, सौ.पार्वती शंकरराव हेलसकर, श्रीमती यशोदा बाबूराव हेलसकर आणि पूज्य स्वामी रामानंद तीर्थ ‘ देशनिष्ठ’ या नावाने रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत. संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.व्ही.के. कोठेकर यांच्याकडे श्री हेलसकर यांनी देणगीचा धनादेश सुपुर्द केला. याप्रसंगी सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, सदस्य डॉ.शरद कुलकर्णी, शंकरराव हेलसकर, स्वाती हेलसकर आणि सान्वी हेलसकर उपस्थित होत्या. बाबासाहेब हेलसकर यांच्या या उपक्रमाबद्दल संस्थेने त्यांचे विशेष अभिनंदन केले. सूत्रसंचालन व आभार प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी मानले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …