हिंगोली,ता 01 (प्रतिनिधी)ः
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांवर वेळोवेळी कठोर कार्यवाही करून सळो की पळो करून सोडले आहे.
दिनांक 01 जून 2026 रोजी डॉ. नीलाभ रोहन पोलीस अधीक्षक हिंगोली यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार परीविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्री मयूर रसाळ यांच्या पथकाला पोलीस स्टेशन सेनगाव हद्दीत युवर अड्ड्यावर छापा टाकून कार्यवाही करण्यासाठी पाठवण्यात आले.
सदरचा जुगार अड्डा हा पोलीस स्टेशन सेनगाव अंतर्गत हत्ता पाटीपासून शेतशिवारामध्ये असल्याने पोलीस पथकाने शेतकऱ्याच्या वेशात जाऊन आता पार्टी पासून एक किलोमीटर अंतरावरील शेतशिवारात छापा मारला असता सदर ठिकाणी जुगारी नामे 1) पुंजाजी लोभाजी गडदे वय 50 वर्ष राहणार हत्ता पाटी
2) ज्ञानबा कोंडूजी पादरे वय 55 राहणार हत्ता
3) अनिल कचरू साळवे वय 50 राहणार साखरा
4) रवी गुलाब चव्हाण वय 37 वर्ष राहणार पाटोंदा तालुका सेनगाव
5) भाऊराव रामराव पवार वय 35 राहणार भानखेडा.
सर्व तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 52 पत्ते चार 4 मोबाईल व जुगाराचे साहित्य रोख रखम 14,610 असा 54,610/- चा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन सेनगाव येथे मटका जुगार व तिरट नावाचा जुगार खेळणे संदर्भाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मयूर रसाळ परीविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक हिंगोली, श्री मोहन भोसले पोनि स्थागुशा,श्री शिवसांब घेवारे, सपोनि स्थागुशा, पोलीस आमलदार भुजंग कोकरे, संदीप जाधव, किशोर सावंत, हरिभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे यांच्या पथकाने केली आहे.
Shabdraj www.shabdraj.com