24/03/26
Breaking News

परभणीत शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

परभणी,दि 10 (प्रतिनिधी)ः
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत असून शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रहिताचे उपक्रम राबविले जात आहेत. संघाच्या सहा प्रमुख उत्सवांपैकी विजयादशमी उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील रोकडा हनुमान मंदीर, नवा मोंढा मैदानावर शनिवारी(दि. ११)आयोजित करण्यात आला आहे.

या उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सनदी लेखापाल व उद्याेजक प्रमोद नरहरराव जाधव तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह अरुण कुमार आदी उपस्थित राहणार आहेत. या उत्सवासस उपस्थित राहण्याचे आवाहन संघाच्या अजय फुलारी, ज्ञानोबा शिंदे यांनी केले आहे.

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …