रमेश बिजुले
पाथरी,दि 14 ः
उमरा ता.पाथरी येथे गोदावरी नदीच्या काठावरील पुरग्रस्तांना डावलुन भलत्याच लोकांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीत टाकत खऱ्या पुरग्रस्तांना लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप नागरीकांना केला असून याबाबत पाथरी येथे तहसिलदारांना निवेदन दिले आहे.
उमरा येथे अनेकांच्या घरात गोदावरी नदीला आलेले पुराचे पाणी घरात घुसले होते त्यात त्यांचे सर्व अन्न धान्य भिजून खराब झाले त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. गावातील तलाठी ए.व्ही. पाते यांनी चुकिचा पध्दतीने नुकसान ग्रस्त कुटुंबाची यादी तयार करून त्यांना शासनामार्फत शिधा देण्यात आला असून खरे पुरप्रस्त कुटुंबांना लाभ देण्यात आला नाही.असा आरोप पुरग्रस्तांनी केला आहे.त्यामुळे या नागरीकांनी मंगळवारी तहसिलदारांना निवेदन दिले आहे.आमच्या घरात पाणी जावून आमचे अन्नधान्य खराब झाले असून आम्हाला शासनामार्फत देण्यात येणा-या शिधा यादीमध्ये नाव न समाविष्ट करणाऱ्या तलाठी यांच्यावर कारवाई करावी अन्यथा या विरोधात आंदोलन आंदोलन करण्यात येईल असा इशारा पूरग्रस्त नागरिकांनी दिला आहे.यानिवेदनावर राजेभाऊ सोपान कोल्हे ,अंकुश खडूळ, सतीश कोल्हे, गोरख बिजुले, ज्ञानेश्वर बिजुले, रमेश बिजुले ,नारायण कोल्हे ,दिलीप दाभाडे ,काशिनाथ कोल्हे, शिवाजी कोल्हे ,मदन कोल्हे, विश्वनाथ कोल्हे, शंकर कोल्हे, नागेश डाके ,उद्धव डाके, वच्छलाबाई भिवसेन डाके पऱ्यागाबाई रामदास कोल्हे, अब्दुल रहीम गुलाब सय्यद ,आदी शेकडो पूरग्रस्त यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Shabdraj www.shabdraj.com