04/02/26
Breaking News

राम जन्मभूमी अयोध्येत धर्मध्वज स्थापना; परभणीत उत्साहात आनंदोत्सव

परभणी / प्रतिनिधी – अयोध्येतील श्री राम जन्मभूमी येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. पाचशे वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला या ध्वजरोहणामुळे प्रतीकात्मक पूर्णविराम मिळाल्याचा आनंद देशभरात व्यक्त करण्यात आला.

 

या निमित्ताने परभणी शहरातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. व्यंकटेश मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात नागरिकांना हिंदुत्वाचे प्रतीक असलेले भगवे झेंडे वाटप करण्यात आले. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर भगवा ध्वज फडकवावा, असे आवाहन करण्यात आले.

 

कार्यक्रमाला भाजपा महानगर परभणीचे सरचिटणीस शंकर आजेगावकर, उपाध्यक्ष रितेश जैन, भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज पोरवाल, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बबलू टाक, व्यंकटेश मंदिराचे अध्यक्ष सर्वोत्तम काका पाथ्रीकर, माधवराव आजेगावकर, डॉ. अनिल रामपुरकर, गजानन गुरु लिंबेकर, भारत गुरु, गुरु जोशी, दीपक कुलकर्णी, योगेश पाथ्रीकर, वेदांत डोंगरकर, मंगेश काळे, गंगा काळे, रोपळेकर काका, प्रभाकरराव कानडखेडकर, शंकरराव काळे तसेच हरिपाठ उपासना मंडळाचे भाविक आणि परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परभणीत साजरा झालेला हा उत्सव उत्साह, श्रद्धा आणि ऐक्याचे प्रतीक ठरला.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …