प्रतिनिधी : सेलू
सावरकरांनी मांडलेल्या हिंदुत्वाचा विचार हा समाज प्रबोधनाचे कार्य होते. सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते आणि ते त्यांच्या आयुष्याच्या अविभाज्य भाग राहिला. देशभक्ती सामाजिक संस्कृती, भाषा, इतिहास,व परंपरा यातुन सांस्कृतिक राष्ट्रवादाची जाणिव निर्माण होते. हिंदुत्व ही केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सावरकरांनी त्याग ,समर्पण, निष्ठा हि तत्वप्रणाली अंगिकारली म्हणून सावरकर हे ज्वलंत हिंदुत्वाचा विचार पेरणारे होते असं स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलू येथील ग्रंथालयात एक दिवस एक पुस्तक या उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमात डॉ.दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर बोलत होते.
सावरकर हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रभक्त जपणारं व्यक्तिमत्त्व होते. सावरकर हे क्रांतिकारी विचार आणि नवतरुणांना देशप्रेम जागृत करण्यासाठी प्रेरणा देत असत. सावरकर हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ असल्याने कायम टिकेचे लक्ष्य राहिले. त्यामुळे सावरकर यांची देशभक्ती आणि विचारांची उंची अधिक प्रेरणादायी राहिली हेही तितकेच लक्षात घेतले पाहिजे. अध्यक्षीय समारोप प्रसंगी उपेंद्र बेल्लूरकर बोलत होते.
ग्रंथालयाच्या वतीने आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचं आयोजन २८ फेब्रुवारी शनिवार रोजी करण्यात आले होते. यांचं कार्यक्रमात जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार प्राप्त ग्रंथपाल महादेव आगजाळ व सौ.अर्चना महादेव आगजाळ यांच्या ग्रंथालयाच्या वतीने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉ.शरद कुलकर्णी तर सुत्रसंचलन प्रा.भाग्यश्री धामणगावकर, आभार सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी मानले
या यावेळी उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार प्राप्त ग्रंथपाल महादेव अगजाळ व सौ अर्चना अगजाळ यांचा डॉ दिवाकर कुलकर्णी यांच्या हस्ते ग्रंथालयाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंडित जगाडे, अनिरुद्ध टाके, सदाशिव महाजन, सर्जेराव रोडगे, यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला डाॅ.विनायकराव कोठेकर,महेश खारकर, अतुल दातार,चंद्रकांत कुलकर्णी, प्रदिप सोन्नेकर, यशवंत चारठाणकर,माधव गव्हाणे, रामराव गायकवाड, विनायक धामणगावकर , प्रदीप कौसडीकर, दिलीप डासाळकर, प्रा. आनंद देशमुख, डॉ.काशिनाथ पल्लेवाड , नारायण ईक्कर , मधुकर वाकडीकर, गौतम सुर्यवंशी, श्रीपाद कुलकर्णी, शेख ए.ए.,वीणा मांडाखळीकर, शैलजा अंबेकर, स्वाती दातार, मधुरा खारकर, शुभदा गोळेगावकर, मीरा धामणगावकर आदींची उपस्थिती होती .
Shabdraj www.shabdraj.com