04/02/26
Breaking News

वालूरच्या शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

सेलू (प्रतिनिधी )
तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मराठी) सीबीएसई पॅटर्न येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन ३ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सावित्रीच्या चिमुकल्या लेकींनी आपल्या प्रभावी कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये ऋतुजा नवघरे, साधना ढवळे, धृती तळेकर, साक्षी खरबे, शुभांगी सारुक आणि साक्षी जायभाये या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांनी आपल्या सादरीकरणातून सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मुख्याध्यापक गोविंद चाटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आणि समाजाला दिलेली नवी दिशा यावर मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, केंद्रप्रमुख दत्तात्रय रोकडे आणि मुख्याध्यापक गोविंद चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक किरण गिल्डा, रामेश्वर गिते, स्वाती हेलसकर आणि लिना ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …