देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. SBI ने सोशल मीडियावर पोस्ट करत उद्या म्हणजे 4 सप्टेंबर रोजी काही तासांसाठी मोबाईल बँकिंग सेवा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. याचा बँकेच्या 44 कोटी ग्राहकांना फटका बसणार आहे. किती वाजता आणि किती तासांसाठी एसबीआयची ही सेवा बंद राहणार आणि ग्राहकांसाठी या काळात पर्याय काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, बँकेची YONO सेवा 4 सप्टेंबर रोजी मध्यरात्री म्हणजेच आज रात्री उशिरा 12:30 ते 1:30 या कालावधीत एका तासासाठी बंद राहणार आहे. या काळात ग्राहक योनो अॅपवर मिळणाऱ्या सेवा वापरू शकणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र या काळात बँकेच्या इतर सेवा मात्र सुरु राहणार आहेत.
Shabdraj www.shabdraj.com