सेलू,दि 22 (प्रतिनिधी)ः
त्र्यंबकेश्वर नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉईस ऑफ मीडियाच्या सेलू तालुका संघटनेच्या वतीने निषेध नोंदवत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांना सोमवार २२ रोजी निवेदन देण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकणासाठी गेलेल्या पत्रकारांवर २० सप्टेंबर रोजी स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत असलेल्या गुंडांनी झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे, पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर भीषण हल्ला करत मारहाण केली. या हल्ल्यात पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले आहेत. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्र राज्यात पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याकडे राज्य शासन व प्रशासन गांभीर्याने बघत नसल्याचे आढळून येत आहे. पत्रकारांवर होणारा हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या खांबावरील हल्ला असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक पत्रकारांवर वारंवार भ्याड हल्ले करून माध्यम स्वातंत्र्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत का अशी शंका पत्रकार बांधवांनी उपस्थित करून पत्रकारांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी राज्य शासन व प्रशासनाने कठोर पावले उचलून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यासाठी तालुकाध्यक्ष शिवाजी आकात,सचिव मोहन बोराडे,कार्याध्यक्ष बाबासाहेब हेलसकर,अशोक अंभोरे,नारायण पाटील,श्रीपाद कूलकर्णी ,डाँ.विलास मोरे ,राम सोनवणे ,लक्ष्मण सोंने आदींची उपस्थिती होती .
यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ कर्मचारी डाके यांनी निवेदन स्वीकारले .
Shabdraj www.shabdraj.com